तूर लागवडीची संपूर्ण माहिती Toor Lagvadichi Sampurna Mahiti In Marathi

Toor Lagvadichi Sampurna Mahiti:- आज आपण या लेखातून भारतातील काही पसिद्ध पिकांपैकी एक म्हणजे तूरी या पिकासंबंधीत काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.तूर हे भारतातील सर्वात महत्वाच्या कडधान्यांपैकी एक महत्वाचे कडधान्य आहे.

भारतातील लोक तूर या कडधान्याला त्यांच्या रोजच्या आहारात वापर करतात. ते त्यांच्या रोजच्या जीवनातील एक महत्वाच्या आहार आहे. या पासून अनेक खाण्याचे पदार्थ बनतात. भारतातील लोकांच्या आहारात तुरीचे वरण खूप जास्त वापरले जाते. त्यामुळे याठिकाणी तूर खूप महत्वाचे आहे. तुरीचे वरण भारतातील लोक खूप आवडीने खातात. आणि खूप लोकांचे हे खूप आवडीचे सुद्धा आहे.

Toor Lagvadichi Sampurna Mahiti In Marathi:-

Toor Lagvadichi Sampurna Mahiti
Toor Lagvadichi Sampurna Mahiti

तूर लागवडीसाठी योग्य जमीन:-

भारतात अनेक लोक वेगवेगळे प्रकारचे पिके घेतात. आणि खूप शेतकरी भारतात वेगवेगळे पिके एकाच जमिनीवर घेतात. प्रत्येक पिकाला वेगवेगळी जमीन पाहिजे असते. आणि आपण वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळे नियोजन करत असतो. तूर या पिकाला कमी पाण्याचा निचरा असलेली जमीन खूप योग्य ठरते. खूप शेतकरी लोक कापूस या पिकासोबत तूर याचे पीक घेते. त्यासाठी जमिनीत कमी पाणी असणे खूप आवश्यक आहे.

जर आपण तुरीला जास्त पाणी दिले तर तुरीचे पाने गळतात. आणि आपले पीक सुद्धा खराब होते. तूर लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करावी लागते. त म्हणजे जमिनीची नांगरणी, कुळवणी त्यानंतर जमीनीमध्ये शेणखत टाकले जाते. तेव्हा जमीन पेरणी साठी तयार होते. पेरणी पूर्वी बियाण्यांला बुरशींनाशक रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

तूर लागवड:-

तूर पेरणी आधी त्यावर बीजप्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला आपल्या बियाण्यांची उगवण क्षमता माहिती होते. तूर लागवड करताना बियाण्यांमध्ये योग्य ते अंतर ठेऊन बियाण्यांची पेरणी करावी. जेणेकरून तुरीचे झाड मोठे झाले कि त्याची वाढ खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. तूर लागवड करताना हेक्टरी १५ ते २० किलो बियाण्याची पेरणी करावी. तूर लागवड करताना बियाण्यातील अंतर हे ६० बाय २० सेंमी किंवा ४५ बाय १० सेंमी पर्यंत केली जाते.

तूर पेरणी करताना १२५ किलो डीएपी देण्याचे करावे. तूर हे पीक लहान असताना त्याची वाढ हळू होते. तूर लहान असताना तणाची वाढ लवकर होत असते त्यासाठी तूर ४५ दिवसाचे होत पर्यंत शेती तणमुक्त ठेवावी यामुळे झाडाची लवकर वाढ होणार व झाडावर रोग येणार नाही. तूर हे पीक पावसाळ्यात येत असते. जर तूर साठी पावसाचा अंदाज कमी वाटला तर पाणी देण्याचे करावे. तरच लवकर झाडाची वाढ होणार व लवकर झाडाला फुल येणार आणि लवकर तुरीच्या शेंगा लागणार.

तुरीला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. जर तुरीला जास्त प्रमाणामध्ये पाणी झाले तर तुरीचे झाड सुकून जाणार किंवा पाने गळून जाणार. तुरीचे जसजसे झाड मोठे होणार तेव्हा रोग येणार तेव्हा अळीची किंवा टॉनिक फवारणी करणे आवश्यक आहे. तुरीवर अनेक प्रकारचे नविन रोग येतात त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर जास्त प्रमाणामध्ये रोग येणार नाही.

फवारणी व त्यावरील उपाय:- Spraying and its solutions

Toor Lagvadichi Sampurna Mahiti
Toor Lagvadichi Sampurna Mahiti

तुरीचे झाड लहान असताना त्याला जास्त फवारणी करण्याची गरज नसते. परंतु जेव्हा ते झाड मोठे होते त्यादरम्यान त्याला योग्य वेळोवेळी फवारणी करणे गरजेचे आहे. जेव्हा तुरीचे झाड मोठे होऊन त्याला पाने येतात. तेव्हा त्याला फवारणी करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा त्याच्यावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो. तुरीच्या झाडाला फुले आल्यानंतर जर वातावरणात बिघाड झाला तर झाडाला आलेल्या फुलांना अळी चा सामना करावा लागतो.

तुरीवर शेणपोखरणारी अळी जर आढळली तर त्याला सायपरमेथ्रीन, क्विनॉलफॉस, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन इत्यादी औषधी तुम्ही तुरीवर फवारणी करू शकता. फवारणी करताना औषधी प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. यामुळे अळी झाडावर जोर करत नाही. आणि झाडाचा त्यापासून बचाव होईल. तुरीला जेव्हा शेंगा तयार होतात तेव्हा सुद्धा अळी चा प्रादुर्भाव वाढतो. तेव्हा कीटकनाशक औषधीची फवारणी करावी. तुरीवर अनेंक प्रकारचे रोग येतात त्यामुळे तुरीची नियमित काळजी घ्यावी.

तुरीच्या जाती:- Caste of Turi

  • फुले राजेश्वरी
  • आय.सी.पी.एल.-८७
  • बी.एस.एम.आर – ७३६
  • बी.डी.एन.-७११
  • विपुला
  • फुले राजेश्वरी
  • बी.डी.एन.-७१६
  • चारू
  • मुन्नी
  • यशोदा

पीक काढणी:- Crop harvest

तूरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे. आणि काही दिवस त्या पिकाला उन्हामध्ये वाळू द्यावे. त्यानंतर क्रेशर द्वारे तुरी काढणी करावी. जर तुरीचे दाणे ओले वाटले तर उन्हामध्ये त्याला वाळू घालावे. तरच तूर पोत्यामध्ये चांगले राहणार आणि आपले पीक विकण्यासाठी सज्ज होणार व जर आपल्याला तूर हे जास्त दिवस विकाची नसेल तर हे पीक अनेक दिवस पोत्यामध्ये सुद्धा चांगले राहणार.

आपल्याला तूर या पीकबद्दल अधिक महिती पाहिजे असल्यास तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट देऊ शकता किंवा कंमेंट करून कळवू सुद्धा शकता. तुम्हाला जर पुन्हा एकाद्या पिकाबद्दल माहिती पाहिजे असल्यास तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. किंवा कमेंट करून कळवू शकता.

FAQ:-

तूर च्या झाडाला शेंगा किती दिवसात लागतात ?

उत्तर:- तूर ला शेंगा ११० ते १३० दिवसामध्ये लागतात.

सर्वात जास्त तूर उत्पादक राज्य कोणते?

उत्तर:- सर्वात जास्त तूर उत्पादक राज्य हे महाराष्ट्र आहे .

तूर दाळला हिंदीत काय म्हणतात?

उत्तर:- अरहर ची दाळ म्हणतात .

तूर लागवड करताना बियाण्यातील अंतर हे किती असावे ?

उत्तर:- तूर लागवड करताना बियाण्यातील अंतर हे ६० बाय २० सेंमी किंवा ४५ बाय १० सेंमी पर्यंत केली जाते.

Leave a Comment