सोयाबीन लागवडीची संपूर्ण माहिती Soybean Lagvadichi Sampurna Mahiti In Marathi

नमस्कार शेतकरी मित्रांनो….!!

Soybean Lagvadichi Sampurna Mahiti:- आज आपण आपल्या या लेखातून भारतातील काही पसिद्ध पिकांपैकी एक म्हणजे सोयाबीन या पिकासंबंधीत काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सोयाबीन हे पिक भारताच्या काही भागात घेतले जातात. आणि सोयाबीन याचा वापर खुप महत्वाच्या ठिकाणी आणि महत्वाच्या कामात सुद्धा केला जातो.

आपण सर्वांना या बाबत माहिती असेलच कि सोयाबीन याचा वापर मुख्य रित्या खाण्याचे तेल बनविण्याकरिता केला जातो. आणि त्यासाठी आपल्याला उत्तम दर्जाची सोयाबीन हवी असते. ज्याचा वापर आपण खाण्याचे तेल बनविण्यात करू शकतो. सोयाबीन हे भारतातील इतर नगदी बियाण्यांपैकी एक नगदी बियाणे आहे. तर आज आपण आपल्या या लेखातून सोयाबीन या नगदी पिकाबद्दल काही माहिती जाणून घेऊयात.

सोयाबीन लागवडीची संपूर्ण माहिती Soybean Lagvadichi Sampurna Mahiti

Soybean Lagvadichi Sampurna Mahiti
Soybean Lagvadichi Sampurna Mahiti

सोयाबीन या पिकासाठी जमीन कशी असावी.. ?

सोयाबीन लागवडीसाठी मध्यम किंवा त्यापेक्षा कमी पाणी असलेली जमीन आपल्याला सोयाबीन या पिकांसाठी उत्तम ठरते.म्हणजेच म्हणण्याचा अर्थ असा कि आपण ज्या ठिकाणी सोयाबीन पेरण्याचा विचार करत असतो त्या जमिनीत पाण्याचे प्रमाण एकदम जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही म्हणजेच पुरेपूर असायला हवे.आणि अशा ठिकाणी आपण सोयाबीनचे पीक खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.तशी आपण सोयाबीन ची लागवड म्हणजेच पेरणी जून महिन्यात करत असतो.

परंतु एकाद्या वर्षी पाऊस हा कमी असतो आणि पाऊस नसला कि आपण सोयाबीन ची पेरणी करू शकत नाही कारण जर आपण सोयाबीनची पेरणी केल्या नंतर पाऊस आला नाही तर आपण सोयाबीन खुप कमी प्रमाणात उगवते आणि काहि वेळ असा पण येतो कि ज्यावेळेस आपल्याला नुकसान सुद्धा होऊ शकते.त्यासाठी नियमाप्रमाणे आपण सोयाबीनची पेरणी उशिरा म्हणजेच २६ जुलै पर्यंत करू शकतो.आणि आपण या कालावधीत केलेली पेरणी आपल्याला चांगला एव्हरेज देईल.

कारण या दरम्यान पाऊस सुद्धा असतो आणि जमीन सुद्धा भुसभुशीत असते आणि यामुळेच पिकाला पाणी बुडापर्यंत गेलेले असते.आणि याचमुळे झाडाला चांगले पाणी होते .सोयाबीन पेरण्याचा आधी लोक यंत्रणांच्या वापर करून त्यांची जमीन भुसभुशीत करतात. आणि त्यानंतर त्याला पाणी घालतात.आणि यंत्रणाचा वापर केला कि आपली बियाणे जमिनीत खोल पर्यंत जाते.आणि लवकर उगवून येते.

सोयाबीन बीजप्रक्रिया कशी करावी….?

सोयाबीन बीजप्रक्रिया कशी करावी
सोयाबीन बीजप्रक्रिया कशी करावी

सोयाबीन पेरणी आधी त्यावर बीजप्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला आपल्या बियाण्यांची उगवण क्षमता माहिती होते.आणि यासाठी खूप लोक कृषी केंद्र मधून बियाणे विकत आणतात आणि त्याची पेरणी करतात्त.परंतु काही लोकांकडे त्यांच्या जुन्या वर्षीची बीयाने तशीच असतात आणि त्याच्या वापर हे लोक दुसऱ्या वर्षी करतात. आणि त्यासाठी आपल्याला त्यावर बीजप्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी आज आपण त्यावरची बीजप्रक्रिया जाणून घेणार आहोत.

सोयाबीन पेरणी च्या वेळेस जर आपल्याकडे घरगुती बियाणे असेल तर थायरम (४.५ ग्राम प्रति किलो ) त्यात टाकावे. किंवा यांच्याऐवजी आपण कार्बेन्डाझिम ५० डब्लू.पी.ची.हे (३ ग्राम प्रति किलो) सुद्धा वापरू शकतो.आणि याची बीजप्रक्रिया करू शकतो. पेरणी करण्याच्या आधी पुन्हा काही बीज प्रक्रिया आपल्याला बियाण्यांवर करणे आवश्यक आहे.ते म्हणजे रायझोनियाम जिवाणू खत आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू खताचा वापर आपण १५ किलो मध्ये २५० ग्राम करू शकतो. आणि याची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकतो. अश्या काही बियाण्यांचा वापर करून आपण आपल्या बियाणांवर बीज प्रक्रिया करू शकतो.

योग्य खत नियोजन…

आपण दरवर्षी आपल्या जमिनीत अनेक प्रकारचे नवीन पीक घेत असतो आणि त्यादरम्यान त्यात आपण अनेक प्रकारचे औषध सुद्धा फवारत असतो जेणेकरून आपल्याला चांगले उत्पन्न झाले पाहिजे. परंतु यामुळे आपल्या जमिनीची उगवण क्षमता कमी होत असते. कारण यामध्ये आपण काही रासायनिक औषधाचा सुद्धा वापर करत असतो आणि काही ठिकाणी हे औषध आपल्या जमिनीसाठी हानिकारक असते आणि यामुळेच आपल्या जमिनीची उगवण क्षमता कमी होत असते.

यामुळे आपल्याला दुसरे बियाणे पेरण्याआधी म्हणजेच दुसरे पिकाची लागवड करण्या आधी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करणे गरजेचे ठरते. त्यामुळे शक्यतोवर आपण सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्यासाठी आपल्याला सोयाबीन च्या उत्पादनासाठी हेक्टरी ५ टन म्हणजेच एकूण २० गाड्या सेंद्रिय खताचा वापर करावा लागतो.

सोयाबीन ला नत्र, स्फुरद, आणि गंधक हे खूप महत्वाचे असते. त्यासाठी सोयाबीन पेरणीच्या एका आठवड्याच्या कालावधीत आपल्याला खताचा योग्य तो डोस द्यावा लागतो. त्यासाठी ३० किलो नत्र , ६० किलो स्फुरद आणि २० किलो गंधक प्रति हेक्टरी देणे खूप आवश्यक असते. आणि काही वेळी आपल्या जमिनीला पालाष सुद्धा कमी पडत असते त्यासाठी आपल्यला त्याठिकाणी ३० किलो पालाश सुद्धा द्यावे लागते.

पेरणी दरम्यान काही आवश्यक गोष्टी –

1) बियाण्यांची निवड करताना आपल्या भागाला जमणार अश्या बियाण्यांची निवड करावी. आपल्या जमीनीला पुरेशे अश्या बियाण्यांची निवड करावी.
2) पेरणी करताना आपल्या जमिनीवर धूळ पेरणी होणार नाही याची काळजी घ्यावी.
3) बियाण्यांची पेरणी वेळेत करावी. जेणेकरून आपल्याला पीक योग्य रित्या घेता येईल.
4) पेरणी करण्याआधी आपल्या जमिनीवर बुरशीनाशक याची फवारणी करावी त्यानंतर जिवाणूंची फवारणी करावी.
5) आपल्या शेताच्या काही ठिकाणी उतार असते तर अश्या ठिकाणी बियाण्यांची आडवी पेरणी करावी.
6) पेरणीच्या आधी आपण पेरणीसाठी घेतलेल्या बियाण्याची उगवणशक्ती तपासून घ्यावी.

कीड रोखणे व खत टाकण्याची योय पद्धत –

सोयाबीन हे पीक द्विदलवर्गीय असल्याने त्याला नत्राची खूप जास्त गरज नसते. काही वेळीच जर सोयाबीनला नत्र कमी होत असेल तर अश्या वेळी नत्राची गरज असते. त्यासाठी सुद्धा आपल्या जमिनीला हेक्टरी २० किलो इतकेच गरजेचे असते. जर आपली जमीन सुपीक असेल तर आपण नेहमी शेणखताचा वापर करत असतो. आणि अशा वेळी आपल्याला आपल्या पिकासाठी रासायनिक खताची खूप कमी गरज असते. जर आपण खत देताना नत्राचा जास्त वापर केला तर आपल्या पिकावर अळ्या येऊ शकतात. म्हणजेच सोयाबीं या पिकावर पाने कझानार्या खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते देताना आपल्याला ते जास्त जाणार नाही याची काळजीने घेणे आवश्यक आहे.

तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या पिकाची योग्य ते पेरणी करून चांगले उत्पन्न घायचे आहे. हे लक्षात ठेवता आपण आपल्या पिकाची योग्य ते काळजी घ्यावी. आणि अधिक महिती साठी आपण आमच्या वेबसाईट ला भेट देऊ शकता. आपल्याला पुन्हा एकाद्या पिकाची माहिती पाहिजे असल्यास कमेंट करून आम्हाला कळवावे.

धन्यवाद….!!

FAQ:-

सोयाबीन च्या बियाण्याला उगवणासाठी किती दिवस लागतात ?

उत्तर:- सोयाबीनचे बियाणे हे साधारणतः ४ ते ५ दिवसात उगवण होते.

सोयाबीन ची लागवड हि कोणत्या महिन्यामध्ये केली जाते ?

उत्तर:- सोयाबीन ची लागवड हि जून महिन्यामध्ये केली जाते.

सोयाबीन लागवडीसाठी जमीन कशी असावी ?

उत्तर:- सोयाबीन लागवडीसाठी जमिन मध्यम किंवा त्यापेक्षा कमी पाणी असलेली जमीन असलेली जमीन असावी.

सोयाबीन बियाणे उगवणासाठी किती अंश तापमान असणे आवश्यक आहे ?

उत्तर:- बियाणांची चांगल्या प्रकारे उगवण होण्यासाठी किमान १८ ते ३५ अंश तापमान असणे आवश्यक आहे.

सोयाबीन पीक हे किती महिन्याचे पीक आहे ?

उत्तर:- सोयाबीन पीक हे ३ ते ४ महिन्याचे पीक असते.

Leave a Comment