कापूस लागवडीची योग्य प्रकिया व त्याचे नियोजन : Proper method of cotton cultivation and its planning In Marathi

Proper method of cotton cultivation:- नमस्कार शेतकरी मित्रांनो krushimadat.com या website द्वारे आपण कापूस आणि त्याच्या संबंधित अनेक पिकांची माहिती जाणून घेणार आहोत. तर आमच्या या लेखात आपण कापूस लागवडीची योग्य प्रक्रिया व त्याचे योग्य ते नियोजन कसे करावे जेणेकरून आपल्याला त्याच्या चांगला लाभ घेता येईल, हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. कापूस लागवडीसाठी काळी व मध्यम स्वरूपाची जमीन असणे गरजेची आहे.

कापूस लागवडीची योग्य प्रकिया व त्याचे नियोजन : Proper method of cotton cultivation and its planning In Marathi

Proper method of cotton cultivation
Proper method of cotton cultivation

जमिनीमध्ये पाण्याचा निचरा असलेली जमीन जर मिळाली तर कापूस लागवडीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. कापूस पीक हे राज्यातील दुसरे मह्त्वाचजे नगदी पीक आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात जास्त प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. कापूस लागवडीच्या पहिले शेतीच्या योग्य प्रकारे मशागत करणे खूप गरजेचे आहे. कापूस लागवड करताना झाडांमध्ये योग्य तो अंतर ठेवणे खूप महत्वाचे आहे. बियाणे निवड करताना जमीन पाहून आपल्या जमिनीला पूरक असे बियाने निवडावे. कापूस लागवड करताना वेळेवर बियाणे टीबने आवश्यक आहे.

जमिनीची निवड : Selection of land

  • जमीन पाणी धरून ठेवणारी व पाणथळ असलेली जमीन कापूस या पिकासाठी हानिकारक ठरते.
  • कापूस हे पीक पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलसंधारण शक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम प्रमाणात असलेल्या व चांगली जमीन असलेल्या ठिकाणी कापूस या पिकाची लागवड करावी.
  • कमी खोली असणाऱ्या व हलकी जमीन असलेल्या ठिकाणी कापसाची लागवड करू नये. कापूस पीक चांगल्या ओरजारे लागण्यासाठी ६० ते ७५ सेमी पावसाच्या प्रदेशामध्ये आपण कापसाची लागवड योग्य प्रमाणे करू शकतो.
  • बियाणांची चांगल्या प्रकारे उगवण होण्यासाठी किमान १५ अंश तापमान असणे आवश्यक आहे.

जमिनीची मशागत : Cultivation of land

जमीन हे दोन ते तीन वर्षांनी एकदा तरी खोलवर नांगरणी करावी. जमीन नांगरणी केली तर जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत केल्या सारखी होते. जमीन नांगरल्याने कचरा सुद्धा कमी वापणार व पीक सुद्धा चांगल्या प्रकारे होणार. जमीन नांगरल्या नंतर पाऊस येण्याची वाट बघावी त्यानंतरच मातीचे ढेपूल फोडण्याचे करावे.

जमिनीची जेव्हा शेवटची वखरणी करतो त्याच्या पहिले शेणखत / कंपोष्ट खत संपूर्ण शेतामध्ये मिसळून द्याव. याचा फायदा म्हणजे आपल्या शेतामध्ये झिंक, मॅग्नेशियम इतर सुक्ष्म मूलद्रव्यांचे प्रमाण वाढत असते. याच्यामुले आपल्या जमिनिमध्ये अधिक सुपीकता राहते व चांगल्या प्रमाने पीक येते.

वाणांची निवड : Selection of Varieties

  • कोरडवाहू शेतीसाठी लवकर येणारे बियाणे व बागायती शेतीसाठी उशिरा येणारे बियाणे निवडावे.
  • महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरडवाहू शेतीमध्ये कापूस लागवड केली जाते. कापूस या पिकाचे बियाणे अनेक प्रकारचे असतात. कापसाचे बियाणे हे कोणते लवकर लागतात तर कोणते उशिरा लागतात.
  • कापूस पिकाचे बियाणे निवडताना जे बियाणे लवकर लागतात तेच बियाणे घेण्याचे करावे.
  • कापूस पीक हे कोरडवाहू भागात पाऊस पडल्यानंतरच बियाणे टीबले जातात तर बागायती कापूस पिकाची लागवड हे जून च्या पहिल्या आठ्वड्यामध्ये लागवड केली जाते.
  • जर आपल्याला कापसाच्या पेरणी साठी जर एक आठवडा उशीर झाला तर आपल्या कापसाच्या पिकामध्ये घट होऊ शकेल. कापूस लागवड हे मान्सून चा अंदाज घेऊन ५ ते ६ दिवसाच्या अगोदर कापसाची लागवड करावी.

कापूस लागवड : Cotton cultivation

कापूस लागवड : Cotton cultivation
कापूस लागवड : Cotton cultivation

कापूस लागवड हे जूनच्या शेवटी केली जाते. कापूस जर कालावधीमध्ये लागवड केली तर अन्य कोणत्या रोगापासून बचाव होतो. कापसाच्या बियाण्यामध्ये तीन ते चार फूट अंतर असते. यामुळे बियाण्यांची उगवण लवकर होते आणि झाडाची लवकरात लवकर झाडाची वाढ होते. कोरवाहू भागात बियाणे टिबल्यावर पावसाची वाट बघत असतात. आणि बागायती शेती मध्ये कापूस टिबल्यावर कापूस ड्रीप च्या साहाय्याने पाणी देतात.

कापसाचे बियाणे हे साधारणतः ४ ते ५ दिवसात उगवण होते. काही दिवस नंत्तर झाडाची वाढ झाली कि डवरन केले जातात. आणि झाडाच्या भोवतालचा कचरा साफ केल्या जाते. कापसाची फवारणी हे वेळेवर करणे आवश्यक आहे नाहीतर त्यावर रोग लवकर येणार. कापूस पीक हे ५ ते ६ महिन्याचे पीक असते. या झाडाची वाढ हे सुरुवातीला हळू असते आणि त्यानंतर त्याची मशागत केल्या नंतर त्या झाडाची वाढ खूप वेगाने होऊ लागते. झाडाची जर मजुरांद्वारे खुरपणी केली तर झाडासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार.

रोग : disease

कापूस या पिकामध्ये जास्त प्रमाणात मावा तुडतुडे, फुलकिडे, बोण्डअळी इ. फुलाचे रस शोषण करणारे रोग कापूस पिकावर येत असतात. रोगापासून जर बचाव कराचा असेल झाडांना वेळोवेळी फवारणी करणे आवश्यक आहे. झाड लहान असण्यापासून ते झाड मोठे होत पर्यंत झाडाची जर चांगल्या प्रकारे मशागत केली तर रोगांपासून झाडाचा चांगला बचाव केल्या जाईल व ते जास्त प्रमाणात उत्पादन सुद्धा देईल.

खत व्यवस्थापन : Manure management

कापूस लागवड करताना सुरुवातीला आपण शेन खताचा उपयोग करत असतो. त्यानंतर कापूस लागवड केल्या नंतर झाडाच्या वाढीसाठी शेणखत किंवा रासायनिक खते टाकली जातात. कापसाचे झाड हे २० ते २५ दिवसाचे झाल्या नंतर त्याला खत देणे आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वांचे खात देणे वेगवेगळे असते. कापसाच्या झाड वाढीसाठी कोणी युरिया, पोटॅश, १०;२६:२६ , २०:२०:०१३, इत्यादी खते शेतकरी कापसाला टाकत असते. कापूस पीक ३० ते ४५ दिवसाचे झाले कि सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली कि झाडांना चांगला फायदा होईल. झाडाची व फळांची वाढ होईल. जर आपण कापूस लागवडीच्या सुरुवाती पासून ये प्रकारे कापसाची लागवड व पाहणी केली तर आपल्याला नक्कीच त्याचा चांगला लाभ होईल.

कापूस वेचणी : Cotton picking

कापसाचे झाड मोठे झाल्या नंतर झाडाचे बोण्ड उगवायला सुरुवात होतात. झाडाचे बोण्ड जो पर्यंत चांगल्या प्रकारे फुलणार नाही तो पर्यंत त्याची वेचणी करू नये. झाडाचे बोण्ड पूर्ण फुलल्या नंतरच कापसाची वेचणी करावी. कापसाचे एकूण ४ ते ५ वेचण्या होतात. कापूस लवकरात लवकर वेचणी केली तर कापसाचे वजन वाढते व उत्पादन सुद्धा वाढते. कापसाची जर चांगल्या प्रकारे माशागत केली तर उत्पन्न सुद्धा चान्गल्या प्रकारे मिळणार.

शेतकरी मित्रांनो कापूस लागवड असो किंवा अन्य कोणत्याही पिकाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्या website ला व्हिसिट करून त्या वर कंमेंट द्वारे सुद्धा कळवू शकता.

धन्यवाद…

FAQ:-

कापसाच्या बियाण्याला उगवणासाठी किती दिवस लागतात ?

उत्तर:- कापसाचे बियाणे हे साधारणतः ४ ते ५ दिवसात उगवण होते.

कापूस लागवड हि कोणत्या महिन्यामध्ये केली जाते ?

उत्तर:- कापूस लागवड हि जून ते जूलै महिन्यामध्ये केली जाते.

कापूस लागवडीसाठी जमीन हि कशी असावी ?

उत्तर:- कापूस लागवडीसाठी जमिनीमध्ये पाण्याचा निचरा असलेली जमीन असावी.

कापसाचे बियाणे उगवणासाठी किती अंश तापमान असणे आवश्यक आहे ?

उत्तर:- बियाणांची चांगल्या प्रकारे उगवण होण्यासाठी किमान १५ अंश तापमान असणे आवश्यक आहे.

कापूस पीक हे किती महिन्याचे पीक आहे ?

उत्तर:- कापूस पीक हे ५ ते ६ महिन्याचे पीक असते.

Leave a Comment