Halad Lagwad ची संपूर्ण माहिती In Marathi

Halad Lagwad ची संपूर्ण माहिती:- नमस्कार शेतकरी मित्रांनो…. !! krushimadat या वेबसाइट वर आपले स्वागत आहे.आज आपण या लेखामध्ये हळद या पिकांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आज भारत देश जगामध्ये सर्वाधिक उत्पादक देश म्हणून ओळखला जातो.

Halad Lagwad ची संपूर्ण माहिती

Halad Lagwad
Halad Lagwad

महाराष्ट्रामध्ये हळद पिकासाठी वातावरण अनुकूल असल्यामुळे हळदीचे उत्पादन वाढत चालेलं आहेत. हळद पीक हे जगभरामध्ये उपयोगी पडणारे महत्त्वाचे पीक मानले जाते. हळद पिकासाठी महाराष्ट्रासाठी अनुकुन मानले जाते. हळद हे महाराष्ट्रामधील सांगली, हिंगोली आणि सातारा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा मानला जातो. हळद पीक लागवड करताना जमिनीची सुपीकता, पाण्याचा स्त्रोत इत्यादी गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. हळद पिकाची संपूर्ण माहिती खालीप्रमाणे बगणार आहो.

पूर्वमशागत


हळद पिकासाठी सुरवातीला जमिनीची ट्रॅक्‍टरच्या साह्याने 25 ते 30 सें.मी.पर्यंत खोल नांगरट करण्याचे करावे त्यानंतर पहिल्या नांगरटीनंतर कमीत कमी 1 ते 2 महिन्यांनी दुसरी नांगरट आडवी करावी. जेव्हा शेतीला चांगली मशागत केली तर पिकासाठी अधिक फायदेशीर ठरते. दुसऱ्या नांगरटीपूर्वी शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून नांगरट करावी. नांगरटी करण्याच्या पाहिले ते मातीचे ढेकळे पाऊसाने भिजले तर अधिक चांगले राहणार त्यानंतर जर नांगरणी केली तर जमीन अधिक सुपीक होणार व पीक लवकर येणार.

हवामान व जमीन

Halad Lagwad
Halad Lagwad

हळद पिकासाठी चांगला निचरा आणि मध्यम प्रतीची जमीन असणे गरजेची आहे. हळद पिकासाठी उष्ण व दमट हवामान असणे गरजेचे आहे. पिकासाठी जमीन ही सुपीकता असणे गरजेचे आहे. जमिनीमध्ये जर चुनखडक असली तर हळदीचे पीक घेणे टाळावे. हळद पिकासाठी कोरडे व थंड हवामान राहले तर पिकासाठी अधिक योग्य राहते.

कंद वाढीसाठी 20 ते 25 अंश सेल्सिअस आणि कंद चांगले पोसण्यासाठी 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. हळदीचे कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीमध्ये हवा खेळती राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिकासाठी जितकी आपण मशागत करणार तितके जास्त प्रमाणात पीक येणार. हळद पिकासाठी जमीन आणि हवामान याचा पुरेपूर अंदाज घेऊन पेरणी केली पाहिजे.

हळदीच्या जाती

  • सेलम
  • राजापुरी
  • फुले स्वरूप
  • कृष्णा
  • आंबेहळद
  • कस्तुरी

हळद लागवड

हळद लागवड
हळद लागवड

हळद लागवड करताना काही महत्वाच्या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.हळद लागवडीसाठी 15 मे ते जूनचा पहिला आठवडा हा कालावधी उत्तम समजला जातो. हळद लागवडीनंतर लगेच दुसऱ्या किव्हा तिसऱ्या दिवशी जमीन थोडी ओलसर असताना फुस्ट (ॲट्राझिन) हे तणनाशक 300 ग्राम प्रति एकरी फवारणी करन्याचे करावे आणि दीड ते दोन महिन्यांनी हळद च्या पिकाला खुरपणी करून घ्यावी.

हळद लागवडीनंतर 2 ते 3 महिन्याने माती भरणी करणे आवश्यक आहे माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी. तरच झाडाला चांगले पीक येणार व जास्त प्रमाणात हळद लागणार. हळद लागवडी पूर्वी सेंद्रिय खताचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग केला पाहिजे तरच झाडाला जास्त प्रमाणामध्ये पोषक घटक मिळणार. हळद पिकाला लागवडीनंतर काही दिवसांमध्ये अन्य रोग सुद्धा येऊ शकणार अशा वेळी झाडाची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जितकी आपण पिकाची काळजी घेणार तितके जास्त प्रमाणामध्ये पीक येणार.

मिरची उत्पादनाची संपूर्ण माहिती

खत व्यवस्थापन

जेव्हा आपण खात टाकणार तेव्हा ऐकरी २५० किलो सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट अॉफ पोटॅश या खतांचा वापर जेव्हा आपण जमीन तयार करणार त्या टाईमाला करावी. हळदीला खत देणे गरजेचे आहे. तरच पिकाला याचा फायदा मिळणार व उत्पादनात वाढ होणार.

कीड रोग नियंत्रण

हळद पिकावर पानातील रस शोषून घेणारा ढेकूण ह्या महत्वाच्या किडी रोग आहेत त्याचबरोबर हळद पिकामध्ये कंद माशी, पाने खाणारी व पाने गुंडणारी अळी असते यासाठी पिकांची अधिक काळजी घेणे महत्वाचे आहे. हळद पिकाला जर जास्त प्रमाणात रोग येऊ द्याचा नसणार तर पिकाला जास्त प्रमाणामध्ये औषधाची फवारणी करणे गरज

तूर लागवडीची संपूर्ण माहिती

हळद काढणी आणि उत्पादन

हळद पिकाची लागवड हे मे ते जून महिन्यामध्ये केली जाते. हळद हे जमिनी मध्ये लागत असते.हळद लागवडीसाठी वापरण्यात येणारे बेणे चांगल्या प्रकारचे असावे. हळद लागवडीसाठी बेणे हे सडलेले आणि कुजके गड्डे बियाण्यासाठी वापरू नयेत. अन्यथा हळद चे पीक जास्त प्रमाणामध्ये येणार नाही.हळदीचे चांगल्याप्रकारे लागवड आणि काळजी घेतली तर ओल्या हळदीचे 90 ते 100 क्विंटल पर्यंत उत्पादन होते. आणि वाळलेल्या हळदीचे 20 ते 30 क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळू शकते. हळदीची काढणी केल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर हळदीला शिजवली जाते. आणि त्यानंतर उन्हामध्ये हळदीला सुकू द्यावे. हळद सुकल्यानंतर त्याला बाहेरील आवरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याला यंत्राच्या साहाय्याने पोलिश करावे. यामुळे हळद सुद्धा चांगली दिसणार.

शेतकरी मित्रानो जर तुम्हाला कुटल्याही पिकांची माहिती पाहिजे असल्यास comment वर तुम्ही message करू शकता किंवा इमेल द्वारे विचारू शकता. या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल सर्वांचे

हरभरा पिकाची संपूर्ण माहिती

FAQ:-

हळद पिकाची लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली जाते?

उत्तर:- हळद पिकाची लागवड हे मे ते जून महिन्यामध्ये केली जाते.

हळद पीकाची खुरपणी केव्हा केली जाते?

उत्तर:- हळद पीक दीड ते दोन महिन्यांनी हळद च्या पिकाला खुरपणी करून घ्यावी.

हळद पिकासाठी जमीन कशी हवी?

उत्तर:- हळद पिकासाठी चांगला निचरा आणि मध्यम प्रतीची जमीन असणे गरजेची आहे.

हळद पिकासाठी हवामान कसा हवा?

उत्तर:- हळद पिकासाठी कोरडे व थंड हवामान राहले तर पिकासाठी अधिक योग्य राहते.

Leave a Comment