दोडका लागवडीची संपूर्ण माहिती Dodka Cultivation Information In Marathi

Dodka Cultivation Information:- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण दोडका पिकाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. दोडक्याला रिज गॉर्ड, अँगल लफ्फा किंवा स्पंज गॉर्ड देखील म्हणतात. दोडका पीक अनेक उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये लोकप्रिय भाजी आहे. दोडक्याचे बियाणे जर निवडायचे असल्यास चांगल्या कंपनीचे बियाण्याची निवड करावी.

Dodka Cultivation Information
Dodka Cultivation Information

दोडका लागवडीची संपूर्ण माहिती Dodka Cultivation Information:-

दोडका पिकाची उन्हाळी लागवड ही जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये करावी आणि पावसाळी लागवड ही जून ते जुलै मध्ये करावी. दोडका पीक हे वेलाला लागत असते. याचा वेल हा 50 फूट पर्यंत पोहोचू शकतो. दोडक्याची बियाणे ओळींमध्ये किंवा टेकड्यांमध्ये पेरावे आणि रोपांमध्ये सुमारे 2-3 फूट अंतर आणि ओळींमध्ये 4-6 फूट अंतर असणे आवश्यक आहे. तरच झाडांना हवा लागणार व फळे लवकर येणार. मानवी आरोग्यासाठी दोडके हे फायदेशीर आहे. दोडक्याचा उपयोग अन्य औषधी साठी सुद्धा केला जातो. दोडक्याची भाजी किंवा चटणीही सुद्धा बनवली जाते.दोडके या पिकांबद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

हवामान आणि जमीन Weather and land:-

दोडका पिकासाठी उष्ण व दमट हवामानात असणे गरजेचे आहे तरच झाडाची लवकर वाढ होणार. दोडका पिकासाठी 25-35 डिग्री तापमानाची आवशकता आहे यामुळे झाडाच्या वाढीसाठी योग्य मानले जाते. दोडका लागवडीसाठी जमीन हि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. दोडका हे पीक उन्हाळा किंवा पावसाळा या दोनी हंगामामध्ये लावले जातात.

हवामानात जर थंड राहले तर याची उत्तम वाढ होते. योग्य टाईमला आणि योग्य प्रमाणामध्ये पाणीपुरवढा केला या आपण त्याची काळजी घेतली तर उत्पादनात वाढ होणार . दोडका या पिकाची लागवड हि मृदाक्षेत्र असलेल्या भागात जास्त प्रमाणामध्ये लागवड केली जाते. दोडका साठी कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असलेल्या भागात लागवड करू नये.

दोडका पूर्वमशागत व लागवड Dodka pre-cultivation and planting:-

Dodka pre-cultivation and planting
Dodka pre-cultivation and planting

दोडका लागवड करताना सुरुवातीला बियाण्याची लागवड केली जाते त्यासाठी जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत केली जाते. जमीन तयार करताना जमीन उभी व आडवी नांगरून घ्यावी. नंतर जमिनीमध्ये जर तण आणि गवताचे तुकडे असल्यास त्याला बाहेर काढावे. जमीन तयार झाल्यावर कंपोस्ट खत घालून ते जमिनीमध्ये चांगल्याप्रकारे मिसळवावे त्यानंतर दोन ओळीत 1.5 ते 2.5 मीटर अंतरावर आणि दोन वेलींमध्ये 50 ते 100 सेंमी खत टाकावे आणि जमिनीमध्ये ते खात पसरवताना सारखे असणे गरजेचे आहे.

दोडक्याची बियाणे लागवड करताना त्या बियाना सहा तास पाण्यामध्ये भिजवा त्यानंतर बियाणे लावावी. बिया लागवड करताना प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन बिया लागवड करावी. बिया लागवड झाल्यावर बियाणं चांगल्या प्रकारे पाणी द्यावे झाडे लहान असताना त्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. झाडांमध्ये ५० ते १०० सेंमी चे अंतर असणे गरजेचे आहे. दोडक्याची रोपे लागल्यावर तीन आठवड्यांनंतर जास्त प्रमाणात आलेली झाडे पातळ करावी आणि प्रत्येक ठिकाणी केवळ दोन रोपे ठेवावी.

दोडक्याची जेव्हा झाडे वाढणार तेव्हा त्या झाडांची चांगल्या प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. झाडाभोवतालची जागा साफ ठेवणे गरजेचे आहे. माती नेहमी ओली असणे गरजेची आहे. जमीन स्वच्छ असणे गरजेचे आहे. दोडक्याच्या वेल मोठा झाल्यावर आधारासाठी बांबू किंवा वाळलेल्या झाडाच्या फांद्या वापरा यामुळे वेल खाली येणार नाही दोडके बांबू च्या आधारे वर राहणार. वेलांसाठी बांबू च्या आधाराची गरज असते. कारण जर दोडक्याला माती लागली तर दोडके खराब सुद्धा होणार. जितकी आपण पिकांची काळजी घेणार तितके पीक वाढणार.

दोडक्याला मंडप पद्धतीने उत्पादन चांगले मिळते व क्वालिटी सुद्धा चांगली मिळते. यासाठी चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. दोडका पिकांसाठी पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. दोडका पिकामध्येठिबक सिंचन केले तर अगदी फायदेशीर ठरणार. ठिबक सिंचन मुळे झाडाचे लवकर वाढीसाठी मदत होते. हिवाळ्यात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पाणी दिले तर चांगले राहणार. आणि उन्हाळ्यात सकाळी नऊच्या आत पाणी आवश्यक आहे. जर झाडांना पाण्याची कमतरता भासली तर दोडके पोकळ राहतात. फळ जर पोकळ राहले तर दोडक्याला बाजारात भाव मिळणार नाही. या फळाची साईज 60 ते 75 सेमी लांबीची असतात.

रोग व कीड Disease and pest:-

दोडका या पिकांवर अनेक प्रकारचे रोग येऊ शकणार त्यामुळे याची चांगली काळजी घेणे गरजेचे आहे. या पिकांवर प्रामुख्‍याने केवडा व भुरी रोगाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असतो या दोनी रोगांसाठी डिनोकॅप व डायथेन झेड अशे दोन औषधी आहे. या औषधीचा योग्यरीत्या फवारणी केली तर रोग निघून जाणार.भुरी रोगांसाठी डिनोकॅप ची फवारणी करावी आणि केवडा रोगासाठी डायथेन झेड या औषधाची फवारणी करावी.

दोडक्यावर जर अळी चा प्रादुर्भाव वाटला तर मेलॉथिऑन, ट्रायअॅझोफॉस अशे दोन औषधी आहे. झाडावर ज्या प्रकारची अळी असणार त्यासाठी वेगवेगळे औषधाची फवारणी करावी. या पिकांवर तांबडे भुंगिरे, फळमाशी व मावा या किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी झाडांची व फळाची काळजी घेणे आवश्यक आहे.

FAQ:-

दोडका पिकासाठी हवामान कसा हवा?

उत्तर:- दोडका पिकासाठी उष्ण व दमट हवामानात असणे गरजेचे आहे.

दोडका पिक हे उन्हाळी लागवड केव्हा केली जाते ?

उत्तर:- दोडका पिकाची उन्हाळी लागवड ही जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये केली जाते.

दोडका पीकाला फळे किती दिवसानी लागतात ?

उत्तर:- दोडका पिकास 60 दिवसांनी फूले येतात. प्रत्‍येक वेलीस 15 ते 20 फळे लागतात.

दोडका साठी इंग्रजी शब्द काय आहे?

उत्तर:- दोडका ला इंग्रजी मध्ये ( कडबा लुफा ) आणि घोसावला ( गुळगुळीत लुफा ) असे म्हणतात.

Leave a Comment