काकडी लागवडीची संपूर्ण माहिती Cucumber Cultivation Information In Marathi

Cucumber Cultivation Information In Marathi:- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण काकडी पिकाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. काकडी चा उपयोग हा जास्त प्रमाणामध्ये सलाद म्हणून उपयोग केला जातो. उन्हाळ्यात या पिकाला जास्त प्रमाणामध्ये मागणी असते.

काकडी लागवडीची संपूर्ण माहिती Cucumber Cultivation Information:-

Cucumber Cultivation Information
Cucumber Cultivation Information

काकडी पासून अनेक नवीन रेसिपी केल्या जातात. अनेक लोकांच्या दररोजच्या आहारात काकडी चा समावेश असतोच. काकडी पीक हे वेलाला लागत असते काकडी रोज खाल्यामुळे शरीरामध्ये उष्णतेपासून थंडावा मिळतो व जर शरीरामध्ये पाण्याची कमतरता असणार ते पाण्याची कमतरता पूर्ण करते.

काकडी खाणे हे शरीरासाठी अगदी फायदेशीर आहे. बाजारपेठेत काकडी या पिकाला जास्त प्रमाणामध्ये मागणी हि उन्हाळ्यामध्ये असते. काकडी या पिकाची पाने हि केसाळ व त्रिकोणी आकाराची असते व त्याची फुले पिवळ्या रंगाची असतात. या फळामध्ये पाणी ९० ते ९६ टक्के असते.

काकडी पीक हे भारतीय पीक मानले जाते परंतु या पिकाची लागवड हि सर्व देशामध्ये केली जाते. काकडी हे पीक खरीप आणि उन्‍हाळी हंगामामध्ये घेतले जाते. काकडी या पिकाचे संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे जाणून घेणार आहोत.

हवामान आणि जमीन Climate and Land:-

काकडी पिकास हवामान हे उष्ण व कोरडे राहले तर अगदी चांगले राहणार. काकडी पिकास जमिनीमध्ये पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी आणि मध्‍यम ते भारी जमीन असणे आवश्यक आहे.

काकडी पिकास जमीन तयार करतांना शेतामध्ये उभी आडवी नांगरणी करावी त्यानंतर ढेकळे फोडून काढावी आणि एक वखरणी करावी. यामुळे जामीन पीक लागवडीसाठी अगदी चांगली होणार. त्यानंतर शेतामध्ये चांगले कुजलेले ४० ते ५० गाड्या शेणखत टाकावे. त्यानंतर चांगली वखरणी करावी.

काकडी पिकास आता जमीन तयार झाली आहे. आणि काकडी लागवड करताना शक्यतो मल्चिंग पेपर व ईनलाईन ट्रीप टाकूनच करावी कारण कचरा होणार नाही व पाण्याची कमतरता भासणार नाही.

काकडीचे वाण Cucumber Varieties:-

काकडी मध्ये अनेक वाण आहे. प्रत्येक वाणाची वॆशिष्ट्ये हि वेगवेगळी आहे.

  • प्रिया:- हे वाणाची जात संकरीत असून फळे हि रंगाने गर्द हिरवी व सरळ असते. या वाणाचे हेक्‍टरी उत्‍पादन 30 ते 35 टन मिळते.
  • शीतल वाण :- या वाणाला पेरणी केल्यावर ४५ दिवसांनीच फळे लागण्यास सुरवात होते. हे वाण डोंगर उताराच्‍या हलक्‍या आणि जास्‍त पावसाच्‍या प्रदेशात चांगली वाढते. या वाणाचा रंग हा हिरवा व मध्यम रंगाचा असतो. जे फळ कोवळे असते त्याचे वजन हे २०० ते २५० ग्रॅम राहते. या वाणाचे हेक्टरी उत्पादन हे ३० ते ३५ टन असते .
  • पुसा संयोग:- हे वाण लवकर येणारी जात आहे. फळाचा रंग हा हिरवा असतो . या फळाला जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे. कारण याचे उत्पादन सुद्धा जास्त आहे व झाडाला फळे लवकर येतात.
  • पुना खीरा:- या वाणांमध्ये फळे हि पिवळट तांबडी आणि हिरवा रंग असतो. या वाणाचे बाजारात दोन प्रकारचे बियाणे मिळतात. हे वाण लवकर येणारे आहे पण फळे आखूड असतात. या फळाची जात उन्‍हाळी हंगामात चांगली राहते. या फळाचे उत्पादन हे १३ ते १५ टन मिळतात.
  • काकडी पिकास या शिवाय पॉंइंट सेट, हिमांगी, फुले शुभांगी यासारख्‍या जाती लागवडीस योग्‍य आहेत.

काकडी लागवड व व्‍यवस्‍थापन Cucumber Cultivation and Management:-

Cucumber Cultivation and Management
Cucumber Cultivation and Management

काकडी लागवड करताना बियाणे हि हेक्टरी २.५ ते ४ किलो लागतात. काकडी हे पीक खरीप आणि उन्‍हाळी हंगामामध्ये घेतले जाते. काकडी लागवड करताना बियाण्याची निवड हि चांगली असणे गरजेची आहे. तरच काकडी लवकर लागणार. काकडी लागवड करताना हंगाम बघून बियाण्याची लागवड करावी.

काकडी लागवड करताना बेड वर लागवड करावी व त्याचे अंतर हे ४ ते ५ फूट असणे आवश्यक आहे. काकडी लागवड करण्याच्या पहिले संपूर्ण बेड ओले करावे. काकडी लागवड झाल्यावर एक महिन्यानंतर झाडाला काठीच्या सहाय्याने बांधणी करावी.

काकडी लागवड झाल्यावर २५ ते ३० दिवसानंतर जर झाडाच्या खाली गवत असला तर तो काढून टाकावा आणि झाडाला फळे लागल्यावर फळाचा संपर्क हा मातीशी होणार नाही याची काळजी घेणे गरजेची आहे. काकडी ला पावसाळ्यामध्ये पाणी ९ ते १० दिवसांनी पाणी दिले तरी चालणार. आणि उन्हाळ्यात पाणी ४ ते ५ दिवसांनी देणे आवश्यक आहे.

काकडी लागवडीनंतर एक महिन्यांनी झाडाला जर नत्राची आवश्‍यकता वाटली तर नत्र द्यावे. काकडी पिकास फवारणी करणे आवश्यक आहे. काकडी पिकांची चांगल्या प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. काकडीला रोग येण्याच्या सुरवातीला फवारणी करणे गरजेचे आहे. यामुळे रोगापासून पिकाला वाचवता येणार. व काकडी पिकास चांगले उत्पादन मिळणार.

काढणी व उत्पादन Harvesting and Production:-

काकडी पिकाची काढणी करताना फळे थोडी कोवळी असल्यास तोडावेत यामुळे बाजारामध्ये काकडीला चांगला भाव मिळणार. काकडी पिकांची तोडणी हि २ ते ३ दिवसामध्ये करणे आवश्यक आहे.

काकडीचे उत्पादन हे जाती व हंगामानुसार प्रति हेक्टरी २०० ते ३०० क्विंटल पर्यंत उत्पादन होऊ शकेल. काकडी चांगल्या प्रकारे जर देखभाल केली अशाप्रकारे उत्पादन होणार. काकडी या पिकांची मागणी हि वर्षभर असते.

महाराष्ट्राच्या आहारात काकडीचे महत्व अधिक आहे. यामुळे जर पिकांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर काकडी पिकाची जास्त प्रमाणात उत्पादन मिळू शकते.

FAQ:-

काकडी पिकांची तोडणी किती दिवसांनी करावी ?

उत्तर:- काकडी पिकांची तोडणी हि २ ते ३ दिवसामध्ये करणे आवश्यक आहे.

काकडी पिकांची लागवड कशी करावी आणि किती अंतरांवर करावी ?

उत्तर:- काकडी लागवड करताना बेड वर लागवड करावी व त्याचे अंतर हे ४ ते ५ फूट असणे आवश्यक आहे.

काकडी पिकांची पाने कोणत्या रंगाची व पानांचा आकार कसा आहे ?

उत्तर:- काकडी या पिकाची पाने हि केसाळ व त्रिकोणी आकाराची असते.

काकडी पिकांच्या फुलांचा रंग कोणता आहे.

उत्तर:- काकडी पिकाची फुले पिवळ्या रंगाची असतात.

काकडी मध्ये किती टक्के पाणी आहे ?

उत्तर:- काकडी या फळामध्ये पाणी ९० ते ९६ टक्के आहे.

Leave a Comment