मिरची उत्पादनाची संपूर्ण माहिती Mirchi Utpadnachi Sampurna Mahiti In Marathi

Mirchi Utpadnachi Sampurna Mahiti :- नमस्कार शेतकरी मित्रांनो….!! आज आपण या लेखातून भारतातील खूप ठिकाणी घेत असलेल्या मिरची या पिकाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.मिरची लागवडीचे प्रमाण भारतात खूप वाढले आहे.त्यापैकी भारतातील महाराष्ट्र राज्यात मिरची चे पीक हे जास्त प्रमाणात घेतले जाते. मिरची हा एक भाजीचा प्रकार आहे. त्याचे पान गुळगुळीत आणि एकामागुन एक असे असतात.मिरची मध्ये (अ ब क) हे जीवनसत्वे आढळतात.

Mirchi Utpadnachi Sampurna Mahiti
Mirchi Utpadnachi Sampurna Mahiti

मिरची उत्पादनाची संपूर्ण माहिती

मिरचीमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉसफरस हि खनिजे आढळतात. जे आपल्या शरीराला खूप लाभदायक आहे. मिरचीमध्ये असलेल्या कॅप्सायसिन नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखट चव मिळते. मिरची चा रंग दाट हिरवा असते. आणि त्यानंतर ते वाळल्या नंतर त्याचा रंग बदलून लाल रंगाचा होतो. मसाल्यामध्ये मिरचीचे प्रमुख स्थान आहे. मिरचीचा वापर साधारणतः तिखट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. यामध्ये अनेक प्रकारचे उत्तम गुणसूत्रे आहेत जे आपल्या शरीराला खूप लाभदायक ठरते.

मिरचीपासून अनेक पदार्थ बनवू शकतो. जसे कि, हिरव्या मिरचीचे लोणचे , मिरचीचा ठेचा , आणि लाल मिरचीचा वापर तिखट बनविण्यासाठी सुद्धा केला जातो. मिरचीला वर्षभर मागणी असते. विविध तापमानात मिरचीची लागवड केली जाऊ शकते, ज्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांना या पिकाचा फायदा होऊ शकतो. इतर पिकांच्या तुलनेत, मिरचीच्या शेतीने स्टार्टअप खर्च कमी केला आहे, जो लहान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.

मिरची लागवड Mirchi Lagvad

मिरची लागवडीसाठी पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा असलेली व उत्तम अशी जमीन पाहिजे. त्यामुळे मिरचीचे पीक चांगल्या प्रमाणात होऊ शकते. जमींन जर हलकी असली आणि त्यात जर आपण पुरेसे खत दिले तर उत्पन्न चांगले येते.मिरचीसाठी हवामान उष्ण असलेले फायदेशीर ठरेल. हिरच्या मिरचीच्या पिकासाठी १८ ते २६ अंश सेल्शियस तापमानाची आवश्यकता असते. त्यामुळे मिरचीच्या पिकाची उगवण क्षमता लवकर वाढते. असलेल्या ठिकाणी मिरचीच्या पिकाची उगवण क्षमता जास्त होते.

मिरचीच्या मध्ये अनेक प्रकारच्या जाती आहे. मिरचीचे पीक अनेक देशामध्ये घेतले जाते. मिरची लागवडीमध्ये भारत हा अग्रेसर आहे. जगात सर्वात जास्त मिरचीचे पीक भारतात घेतले जाते. मिरची पिकाच्या लागवडीचा हंगाम हा ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असतो. मिरचीच्या पिकाची लागवड करताना सुरुवातीला मिरचीचे रोपे तयार करतात. मिरची लागवडीसाठी जमीन नांगरून व कुळवून जमिन भुसभुशीत केली जाते. त्यानंतर जमिनीमध्ये शेणखत टाकले जातात.

मिरची लागवड करण्यापूर्वी अनेक शेतकरी जमिनीची सुपीकता तपासतात आणि त्यानंतरच मिरचीची लागवड करणे योग्य असते. मिरची लागवड करण्याचे अनेक प्रकार आहेत त्यात काही लोक सपाट वाफ्यावर करतात तर एकही मल्चिंग पेपर वर सुद्धा करत असतात.मिरचीच्या बियांच्या लागवडीसाठी आठ ते दहा सेंटीमीटर इतक्या अंतरावर वाफे तयार करावेत आणि त्यानंतर त्यात टक्के १५ ग्राम दाणेदार फोरेट टाकून त्याला मातीने झाकून द्यावे.

त्यानंतर आपण बनविलेल्या वाफ्यामध्ये दोन सेंटीमीटर अंतरावर मिरचीच्या बियाण्यांची पातळ पेरणी करावी. आणि त्यानंतर ३० ते ४० दिवसापर्यंत देखरेख करावी. आणि त्यानंतर ३० ते ४० दिवसानानंतर त्याचे रूपांतर रोपात होऊन ते लागवडीसाठी तयार असते. मिरचीच्या पिकासाठी रोपांतील अंतर ६०*६० सेंटिमीटर असावी लागते.

मिरचीच्या झाडाची उंची वाढत असल्यास त्याच्या मुळांची काही प्रमाणात चटणी करावी . मिरचीच्या पिकाची लागवड केल्या नंतर त्या पिकाला दोन ते तीन वेळा खुरपण्याची आवश्यकता आहे. मिरचीच्या रोपांच्या भोवताल गवत झाले तर त्याची लवकर काढणी करावी. यामुळे मिरचीच्या झाडाला हवा लागणार आणि पीक चांगले येणार.

मिरची च्या काही जाती….

 • अर्का मेघना
 • अर्का श्वेता
 • ज्वाला
 • फुलेसही
 • पांडी
 • ब्लॅक सीड
 • काश्मिरी
 • पंत सी १
 • सी ५
 • जयंती
 • संकेश्वरी
 • अग्निरेखा
 • नंदिता रोशनी

मिरचीच्या पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन

प्रत्येक पिकाला पाण्याची गरज असते त्याचप्रमाणे मिरचीला सुद्धा पाण्याची गरज असते. त्यासाठी आपल्याला या पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन माहिती असणे तितकेच आवश्यक आहे. कारण जर आपण मिरचीच्या पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन केले नाही आणि आपल्याकडून या पिकाला जास्त प्रमाणात पाणी दिले गेले तर मिरचीचे झाड जळतात. आणि आपल्याला त्याचे नुकसान सुद्धा होऊ शकते. यामुळे या पिकांसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे तितकेच आवश्यक आहे.

मिरचीच्या पिकाचे दोन हंगामात विभाजन केले आहे. ते म्हणजे राबबी आणि खरीप हंगाम अश्या दोन हंगामात विभाजन केले जाते. मिरचीच्या पिकाची लागवड आपण कोणत्याही ऋर्तुत करु शकतो. जर उन्हाळ्यामध्ये आपण मिरचीच्या पिकाची लागवड करत असेल तर त्यासाठी जानेवारी ते फेब्रुवारी हे दोन महिने उत्तम ठरतात. मिरचीला ph हा साडेसहा ते साडेसात असावा लागतो.

मिरचीच्या पिकासाठी लागणार खर्च

मिरचीच्या पिकासाठी लागणार खर्च हा त्याच्या नियोजनावर अवलंबून असतो. मिरची या पिकाला १ एकरमध्ये साधारणता ६० हजार ते १ लाख खर्च असतो . मिरचीचे जर आपण चांगल्या पद्धतीने नियोजन केले तर कमी खर्चात उत्पादन घेऊ शकेल.

मिरची पिकाची काढणी

मिरची या पिकाची काढणी हे अडीच ते तीन महिन्यात केली जाते. मिरचीची चांगल्या प्रकारे वाढ झाल्यानंतर मिरचीची तोडणी हे दहा दिवसाच्या अंतरावर केली जाते. मिरची हे पीक साधारणतः तीन महिने असते आणि त्यादरम्यान मिरचीची तोडणी आठ ते दहा वेळा केली जाते. मिरची जेव्हा वाढली जाते तेव्हा त्याचा रंग बदलून लाल होतो आणि तेव्हा ते तोडून वाळवली जाते आणि पुढे त्याचा वापर तिखट बनविण्यात केला जातो. मिरचीचे उत्पादन हवामान, बियाणे, आणि मेहनतीवर पूर्णपणे अवलंबून आहे.

आपल्याला या पिकाबद्दल अधिक माहिती पाहिजे असल्यास आम्हाला कंमेंट द्बारे कळवू शकता. आणि अश्या अधिक पिकांबद्दल माहिती घेण्यासाठी आपण आमच्या वेबसाइट ला व्हीझिट देऊ शकता.

धन्यवाद….!!

FAQ:-

मिरची पिकाची काढणी किती महिन्यानंतर केली जाते ?

उत्तर:- मिरची या पिकाची काढणी हे अडीच ते तीन महिन्यात केली जाते.

मिरची पिकाची लागवड हि किती अंतरावर करावी ?

उत्तर:- मिरचीच्या बियांच्या लागवडीसाठी आठ ते दहा सेंटीमीटर इतक्या अंतरावर वाफे तयार करावेत.

मिरची मध्ये (अ ब क) हे जीवनसत्वे आहेत ?

उत्तर:- मिरची मध्ये (अ ब क) हे जीवनसत्वे आढळतात.

मिरची ला वाढीसाठी किती सेल्सियस तापमान लागतो ?

उत्तर:- हिरच्या मिरचीच्या पिकासाठी १८ ते २६ अंश सेल्शियस तापमानाची आवश्यकता असते.

Leave a Comment